*कोकण Express*
*▪️फटाक्यांच्या आतषबाजीला फाटा देवून कासार्डेतील तनीश आणि करण कदम बंधुनी साकारले उत्कृष्ठ किल्याची प्रतीकृती*
*कासार्डे ः संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठ्ठा येथिल नववीत शिकणारा कु.तनिश कदम व चौथीतील कु. करण कदम या लहान दोन भावांनी मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या आपल्या घरांच्या अंगणात किल्ल्याची प्रतिकृती बनविली आहे.
लहान मुले सध्या मोबाईलच्या विळख्यात अडकली असताना त्याना डिजिटल माध्यमातून अनेक किल्ले व खेळ खेळ ते मोबाईलवर खेळतात. मात्र प्रत्यक्षात मैदानी खेळ असो वा मातीत हात घालून किल्ला बनविने असेल हे चित्र सध्या काहीच ठिकाणी पहायला मिळते.बहुतांश मुले दिवाळीच्या सुट्टीत अनेक ठिकाणी किल्ले बनविताना दिसायची मात्र कोरोनामुळे गतवर्षीपासून ही क्रेझ कमी पाहायला मिळाली.
मात्र यंदा कोरोना कमी झाल्याने कासार्डेतील कु.तनिश कदम व कु. करण कदम यानी आपली खंडित झालेली परंपरा पुढे करून आजी आजोबांकडे हट्ट करत किल्ला बनविण्याचे ठरवत किल्ला साकार केला. यासाठी माती पासून ते रंग देण्याचे काम करत मावळे व महाराजांची मूर्ती बसवत शिवाजी महाराजांबद्दल असणारे प्रेम किल्ले बांधणीतून व्यक्त केले आहे. आ किल्ला बनविण्यासाठी आजोबा विलास कदम, आजी पद्मावती कदम, वडील प्रदिप कदम, आई प्राजक्ता कदम व सहदेव खाडये याचे सहकार्य लाभले. सध्या हा किल्ला आकर्षणांचा बिंदू ठरत असून महामार्गावरून जाणारे वाहनचालक, नागरीक व लहान मुले भेट देऊन कदम बंधूंचे कौतुक करत आहेत.