मळेवाड जकात नाका येथे रंगणार नरकासूर स्पर्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच करण्यात आले आहे आयोजन

मळेवाड जकात नाका येथे रंगणार नरकासूर स्पर्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच करण्यात आले आहे आयोजन

*कोकण Express*

*▪️मळेवाड जकात नाका येथे रंगणार नरकासूर स्पर्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच करण्यात आले आहे आयोजन*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

खास दीपावलीनिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून संयुक्तपणे मळेवाड जकात नाका येथे गाव मर्यादित आकाश कंदील स्पर्धा व नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.गावातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी प्रथमच मोठया प्रमाणात गावात गाव मर्यादित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नरकासुर स्पर्धेत एका पेक्षा एक असे नरकासुर दाखल होणार असून नरकासूर स्पर्धेमध्ये कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच आकाश कंदील कंदील स्पर्धेत कोण विजेता ठरणार याकडेही लक्ष लागले आहे. त्यामुळे मळेवाड कोंडूरे गावात प्रथमच घेण्यात येणारी आकाश कंदील व नरकासुर स्पर्धा याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आकाश कंदील स्पर्धा संध्याकाळी पाच ते सात,तर नरकासुर स्पर्धा रात्री आठ ते दहा या वेळेत आयोजित केली आहे. तरी रसिकांनी व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच मीनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, युवा मित्र मंडळ पदाधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!