*कोकण Express*
*▪️नगराध्यक्ष संजू परब पालिकेत फक्त “इनकमिंग” साठी बसलेत*
*▪️शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप; मुख्याधिकाऱ्यां गाडी नाकारली, मग अन्य सहकारी त्यातून फिरतात कसे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्ष संजू परब खोटी उद्घाटने करून नागरीकांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. उद्यानात छत्रपतींचा पुतळा उभारलाच पाहीजे यात दुमत नाही. मात्र त्या बद्दल अन्य नगरसेवकांना विश्वासात न घेता तसेच परवानग्या न घेता ही घिसाडघाई सुरू आहे. त्याचे कंटेनर थिएटरासारखे होवू नये, असा टोला आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला.
परब यांच्या केबीनमधील गांधीजींचा फोटो काढला हे दुर्दैव आहे. त्याचे जनतेला त्यांनी उत्तर द्यावे. तर नव्याने दाखल झालेल्या महिला मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्षांनी गाडी नाकारली मात्र त्यांचे काही सहकारी “त्या” गाडीतून रात्रभर फिरतात, असा आरोप यावेळी केला. शिवसेनेच्या नगरसेविका तथा गटनेत्या अनारोजीन लोबो यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, जयेंद्र परुळेकर,सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी,भारती मोरे आदी उपस्थित होते.