माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

*कोकण Express*

*▪️माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक*

*▪️दिवाळीत अनिल देशमुख तर ख्रिसमसमध्ये अनिल परबांचा नंबर*

*▪️आमदार नितेश राणेनी ट्विटवर द्वारे दिला निशाणा*

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आणि मध्यरात्रीनंतर त्यांना अटक करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई रोखण्याची न्यायालयीन लढाई हरल्यानंतर देशमुख अखेर सोमवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी वकीलासह ईडी समोर हजर झाले. तब्बल तेरा तास त्यांची चौकशी चालली. मध्यरात्र उलटली, 1 वाजला तरी ईडी कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर त्यांची चौकशी सुरूच होती तेव्हाच या अटकेचे संकेत मिळाले होते. ही चौकशी सुरू असतानाच ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार दिल्लीहून तातडीने मुंबईत दाखल झाले. त्यांनीच देशमुख यांच्या अटकेला दुजोरा दिला. मंगळवारी दुपारी देशमुख यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!