*कोकण Express*
*वीज बिलाबाबत भाजपा आक्रमक टप्प्याटप्प्याने यथाशक्ति वीज बिले भरून घ्या भाजपाची मागणी*
*शिवसेनेचे मुख्यमंत्री ,काँग्रेसचे ऊर्जा मंत्री भरमसाठ वीज बिल आणि वीज कनेक्शन तोडणीला ठाकरे सरकार जबाबदार*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
*भाजपा नेते अशोक सावंत ,जि प गटनेते रणजित देसाई ,महिला जिल्हा अध्यक्षा संध्या तेरसे,माजी जि प अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, तालुका अध्यक्ष विनायक राणे,यूवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे, शहराध्यक्ष राकेश कांदे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका*
भारतीय जनता पार्टी च्या वतीने विद्युत महामंडळ जिल्हा कार्यालय कुडाळ येथे प्रत्येक ठिकाणी वीज बिल थकीत असताना ग्राहकांवर विज बिल भरण्यासाठी जबरदस्ती केली जाते अन्यथा वीज कनेक्शन थेट बंद केली जातात याबाबत जाब विचारण्यात आला वीज कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांना घेऊन सात-आठ जणांची टोळी घेऊन फिरतात प्रत्येकाच्या घरी महिला का पाठवले जातात ? वीज बिल वसुली साठी एवढी का ? सक्ती केली जाते ? याबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे ऊर्जामंत्री असताना वीज बिल माफ करू हे ठाकरे सरकारच्या जबाबदार कॅबिनेट मंत्र्यांनी कोरोना काळात जाहीर केले होते सरकार वीजबिल माफ करेल आणि दिलासा जनतेला मिळेल यामुळेच बरेच लोकांची वीज बिल थकीत राहिली आणि शेवटी सरकार तोंडघशी पडल्यानंतर भरमसाठ वाढलेल्या वीज बिलांना जबरदस्तीने जुलमी पद्धतीने वसूल करण्याचे काम हे ठाकरे सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी आता खऱ्या अर्थाने जनतेला तुम्ही सहकार्य करण्याची गरज आहे असे सांगण्यात आले दिवाळी सणाच्या नव्हे तर इतर कुठल्याही सणाच्या काळामध्ये वीज बिल थकीत असताना कुठल्याही प्रकारे वीज कनेक्शन बंद करू नये या मागणीसह ग्राहक जर टप्प्याटप्प्याने यथाशक्ती भरत असेल तर ती बिल भरून घ्यावीत ही जोरदार मागणी या वेळी करण्यात आली व या संबंधित तालुकास्तरावर सर्व अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात येतील आणि ग्राहकांकडून एकरकमी किंवा अर्धे वीज बिले थेट भरून न घेता टप्प्याटप्प्याने यथाशक्ती ग्राहकांकडून वीज बिल भरून घेण्याच्या सूचना करण्यात येतील शिवाय सणासुदीच्या काळात कनेक्शन तोडली जाणार नाहीत याबाबत ची ग्वाही जिल्ह्याचे मुख्य श्री विनोद पाटील यांनी दिली यावेळी भाजपा नेते अशोक सावंत ,जि प गट नेते रणजित देसाई ,तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ संध्या तेरसे,माजी जिप अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते ,भाजप शहराध्यक्ष राकेश कांदे ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रूपेश कानडे ,राजेश पडते ,यांनी प्रश्नांचा भडिमार करत आक्रमक भूमिका घेतली व नागरिकांना त्रास झाल्यास सहन करणार नाही आम्ही आजपर्यंत घेतलेली सहकार्याची भूमिका म्हणजे सहनशीलता समजू नये असा सज्जड दमही अधिकाऱ्यांना दिला यावेळी महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरेसे, बंड्या सावंत ,दिनेश शिंदे ,राकेश नेमळेकर, निलेश परब, ममता धुरी आदिती सावंत, मुक्ती परब ,दीप्ती काजरेकर ,संजय म्हाडगूत,तेंडोली सरपंच भाऊ पोतकर , सुस्मित बांबुळकर ,संजय म्हाडगूत ,बाबल म्हाडगुत तसेच ग्रामीण भागातील व शहरी भागातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.