विशेष मागास प्रवर्गाचे 2% आरक्षण वाचवण्यासाठी SBC समाजाचा शासनाकडे पाठपुरावा

विशेष मागास प्रवर्गाचे 2% आरक्षण वाचवण्यासाठी SBC समाजाचा शासनाकडे पाठपुरावा

*कोकण  Express*

*▪️विशेष मागास प्रवर्गाचे 2% आरक्षण वाचवण्यासाठी SBC समाजाचा शासनाकडे पाठपुरावा*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

एसबीसी प्रवर्गातील जातींचे आरक्षण अबाधित राहण्याची मागणी शासनाकडे वेळोवेळी एसबीसी संघर्ष समितीच्या वतीने SBC संघर्ष समिती अध्यक्ष शशिकांत आमणे यांनी केली आहे. या संदर्भात आता संघर्ष समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आरक्षण बचाव पाठपुरावा आंदोलन करण्यात येत आहे. आज याची सुरुवात कणकवली प्रभारी तहसीलदार प्रिया हर्णे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी SBC संघर्ष संमती सिंधुदुर्ग अध्यक्ष उमेश बुचडे, संघटक मिथुन ठाणेकर, विनायक उबाळे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभि मुसळे, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, अनंत हजारे, प्रदीप लोकरे, विजय कांबळी, सागर हर्णे, संकेत हर्णे, राजश्री धुमाळे, श्रद्धा हजारे, अक्षया हजारे, दीपाली धुमाळे, रजत निग्रे, मुसळे उपस्थित होते

यावेळी एसबीसी बांधवांना आपले 2 टक्के आरक्षण ठिकवण्यासाठी आता उठाव केला असून 50% च्या आतमध्ये स्वतंत्ररित्या आम्हाला दोन टक्के आरक्षण मिळावे यासाठी विशेष मागास प्रवर्गातील जातींनी उठाव केला असून आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच 3 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनाही निवेदन सादर करणार असल्याचेही सर्व एसबीसी बांधवांनी यावेळी सांगत आम्हाला शासन स्तरावर शासकीय योजना मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी सर्व समाज बांधवांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!