*कोकण Express*
*▪️भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वैद्यकीय आघाडी चे डाॅ. अमेय देसाई यांचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा वैद्यकिय आघाडी प्रदेश सहसंयोजक डाॅ. अमेय देसाई यांनी भाजपा जिल्हा कार्यालयात भेट दिली असता भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. अमेय देसाई यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना जिल्ह्यातील आरोग्य सेवेमधील अडचणी सांगीतल्या व भविष्यात वैद्यकीय आघाडीमार्फत सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्हात आरोग्यदुत ही संकल्पना राबवून सर्वसामान्य जनता व वैद्यकीय आघाडी यातील समन्वयकाचे काम करणार असल्याचे सांगितले. तसेच उपजिल्हा रुग्णालयात असणारी वैद्यकीय अधिकारी यांची कमतरता दुर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी डाॅ. अमेय देसाई यांच्यांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जनसंपर्क अधिकारी अनिल म्हात्रे तसेच प्रदेश का. का. शरद चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई उपस्थित होते. या सत्कार समारंभाला महिला मोर्चाच्या प्रदेश का. का. सदस्य प्रज्ञा ढवण, प्रदेश का. का. सदस्य व माजी सभापती सुरेश सावंत, कणकवली शहर मंडलाचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली ग्रामीण चे मंडल अध्यक्ष संतोष कानडे, कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चाचे पप्पु पुजारे, महिला मोर्चाच्या प्राची कर्पे, संजना सदडेकर, सदा चव्हाण, प्रदीप ढवण तसेच कार्यालयीन मंत्री समर्थ राणे व अजय घाडीगांवकर उपस्थित होते.