*कोकण Express*
*▪️माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंना महामंडळावर संधी द्यावी;दीपक केसरकर*
*▪️जलसंपदामंत्री जयंत पाटलांकडे मागणी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजी राज्यमंत्री व एकेकाळचे अत्यंत जवळचे मित्र असलेल्या प्रवीण भोसले यांना एखाद्या महामंडळावर संधी द्यावी अशी मागणी खुद्द त्यांचे एकेकाळचे जवळचे मित्र आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे. राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढीसाठी तत्कालीन परिस्थितीत मोठे काम केले आहे. यात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान करावा असे केसरकर यांनी म्हटले आहे.
केसरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आम्ही राष्ट्रवादीत असताना एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्यांचा मान सन्मान होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
एकेकाळचे अत्यंत जवळचे मित्र असलेल्या केसरकर आणि भोसले यांच्यात राष्ट्रवादीत असताना कटुता निर्माण झाली होती. दोघेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर टीका करत होते. त्यानंतर केसरकरांना कंटाळून भोसले यांनी काँग्रेसचा मार्ग पत्करला होता. त्या नंतर पुन्हा ते राष्ट्रवादीत आले होते. गेले काही दिवस ते पक्षात कार्यरत असले तरी पदापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रवाहात सामावून घेण्यासाठी महामंडळावर संधी द्यावी अशी मागणी केसरकर यांनी केली आहे.