*कोकण Express*
*▪️कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील नवीन लघु धरणाना निधी देण्याची जलसंपदामंत्र्यांकडे मागणी*
*▪️जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा जिल्हा बँकेच्या वतीने केला सत्कार*
*▪️जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत*
*सिंधुदुर्ग*
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंत पाटील यांची जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज हॉटेल लेमन ग्रास कुडाळ येथे भेट घेतली. यावेळी बॅंकेच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पाटील साहेबांचा सत्कार केला. तसेच कणकवली, वैभववाडी व देवगड तालुक्यातील नवीन सर्व्हे झालेल्या छोट्या धरणांना निधीची उपलब्धता होणेसाठी व अपुर्ण राहिलेल्या धरणांसाठी निधीची मागणी निवेदन देऊन केली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या रूपालीताई चाकणकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत, बँक संचालक व्हिक्टर डोन्टस, एम. के. गावडे, काका कुडाळकर, ओटवणेकर, प्रवीणभाई भोसले, बँक संचालक दिगंबर पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.