*कोकण Express*
*▪️तळेरे येथे सुरू असलेल्या बेमूदत उपोषनाला अखेर यश, राजेश जाधव यानी सार्वजनिक बाधकाम विभागाच्या लेखी आश्वासना नंतरच उपोषणाची सांगता केली*
*▪️ग्रामस्थानी फटाक्याच्या आतषबाजीत लेखी आश्वासनाचे स्वागत केले ,मात्र पाठपुरावा करण्याचे बंधन कायम*
*कासार्डे ः संजय भोसले*
गेले दोन दिवस विद्यार्थी व ग्रामस्थांच्या हितासाठी सुरू असलेले उपोषण सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यानी सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग उपविभागिय अभियंता डी जी कुमावत यांच्या लेखी आश्वासना नंतर मागे घेतले. पण इथून पूढे आम्ही परत उपोषन न करता प्रत्यक्ष कृतीतूनच उत्तर देवू असे ठनकावून सांगितले.
या वेळी अभियंता डी जी कुमावत यानी आपल्या लेखी आश्वासनात असे नमूद केले आहे की सदर शैक्षणिक संकुलाच्या दोन्ही दिशेने झाडी मारणे व क्रॅश बॅरियर बसविण्याकरिता आवश्यक जागा सोडून उर्वरीत जागा सेवा रस्त्याप्रमाने वापर करण्या करिता सरफेस प्रिपरेशनचे काम सुरू करण्यात आले असून ते पूर्ण होताच क्रॅश बॅरियर बसविणेत येईल .ते शाळा सुरू होणे पुर्वी म्हणजे १०नोव्हेंबर २०२१पर्यंत पूर्ण करण्यात येईल .
तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आणखीही उपाय योजना करायच्या आहेत, जसे की रबलिंग स्ट्रीप्स,माहीती फलक किंवा रिम्युव्हेबल प्लास्टिक स्पिड ब्रेकर्स इ.बाबतचे कार्यवाही करण्याचे काम खारेपाटण कार्यालयामार्फत सूरू आहे.
शिवाय शैक्षणिक संकुलाचे ठिकाणी मुंबई व पणजीच्या दिशेने असलेल्या चढ आणि उतारामूळे वाहनांकरीता आवश्यक साईड डिस्टन्समध्ये बाधा आल्यास सदरचे ठिकाण अपघात प्रवण क्षेत्र ठरून जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संभाव्य अपघाताचा धोका चौपदरी करताना लक्षात आला नाही. त्यामूळे येथे पादचारी पूल बांधने प्रस्तावित नव्हते.मात्र आता आम्ही आपल्या मागणी नुसार सन.२०२१—२२ च्या वार्षिक आराखड्यात पादचारी पुलाचे काम करण्यासाठी अंदाजे ८०लाख खर्चाचे प्रस्ताव पुढील कार्यवाही व मंजूरीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगून तो लेखी प्रस्तावही राजेश जाधव यांना सुपुर्द करण्यात आला.
यावेळी उपोषण स्थळी वामनराव महाडिक विद्यालयाचे चेअरमन अरविंद महाडिक,मुख्याध्यापक नवले सर,जि. प. सदस्य बाळा जठार, माजी प स सदस्य दिलीप तळेकर,दारूम सरपंच सुनिंद्र सावंत, तळेरेचे माजी सरपंच भाई डंबे, विनय पावसकर,अशोक तळेकर प्रविण वरूणकर ,शशांक तळेकर,उल्हास कल्याणकर , निलेश तळेकर,हनुमंत तळेकर, दिनेश मुद्रस, उपसरपंच दादा तळेकर,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उदय दुदवडकर, सचिव संजय खानविलकर, अमोल सोरप,बळी तळेकर,निलेश सोरप, शैलेश सुर्वे, विश्वास पटेल,दिलीप तेली, हर्षवर्धन रेपे, अमोल सोरप, राजा पाटील,संदिप घाडी ,चिन्मय तळेकर,बाळा तळेकर,विजय पेडणेकर,तेजस भांबूरे ,आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.पोलीस काँस्टेबल अरविंद अनंत जाधव यानी उत्तम परिस्थिती हाताळून आपला बंदोबस्त चोख ठेवला होता.