कणकवली नगरपंचायत नवनवीन उपक्रमांची युनिव्हर्सिटी; भाजपा नेते निलेश राणे यांचे गौरवोद्गार

कणकवली नगरपंचायत नवनवीन उपक्रमांची युनिव्हर्सिटी; भाजपा नेते निलेश राणे यांचे गौरवोद्गार

*कोकण Express*

*कणकवली नगरपंचायत नवनवीन उपक्रमांची युनिव्हर्सिटी; भाजपा नेते निलेश राणे यांचे गौरवोद्गार*

*कणकवली नगरपंचायत व युथ वेल्फेअर असोसिएशन च्या दिवाळी बाजाराचा झाला शुभारंभ*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नाविन्यपूर्ण उपक्रमात कणकवली नगरपंचायत ही एक युनिव्हर्सिटी झाली आहे.मी त्या युनिव्हर्सिटीचा विध्यार्थी आहे. येथे आल्यावर नवीन शिकता येते नवीन गोष्टी पाहायला मिळतात.जिल्हात या कणकवली नागरपंचायतीचे काम आदर्शवत आहे असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेश चिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी काढले.

कणकवली नगरपंचायत व युथ वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून कणकवली पेट्रोल पंपाच्या समोरील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजार च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. भाजपा नेते निलेश राणे म्हणाले,एक बाजारपेठ उभी करणे साधी गोष्ट नाही.कोरोना काळ नुकताच संपला आहे.दिवाळी येते आहे अशा वेळी जनतेचा, व्यापाऱ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची गरज असते ती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे.जेव्हा बाजार चालतो तेव्हा शहरे चालतात, उद्योग वाढतात, व्यापार वाढतो रोजगाराच्या संधी उभ्या होतात. जगभरात अशा गोष्टींना व्यासपीठ असते इथे ते आपल्याला उपलब्ध करून घ्यावे लागते.युथ वेल्फेअर असोसिएशन ने त्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजना सावंत,पंचायत समिती सभापती मनोज रावराणे,उप नगराध्यक्ष बंडू हर्णे,मुख्याधिकारी अवधूत तावडे,Ywa अध्यक्ष तेजस घाडीगांवकर,रोटरी अध्यक्ष डॉ विद्याधर टायशेट्ये,व्यापारी बाबू वळंजू,बांधकाम विराज भोसले,आरोग्य सभापती संजय कामतेकर,महिला बालकल्याण उर्वी जाधव,पंचायत समिती सदस्य मलिंद मेस्त्री,नगरसेवक अभि मुसळे,बाबू गायकवाड,कविता राणे,मेघा गांगन,मेघा सावंत,सुप्रिया नलावडे,कविता राणे,स्वीकृत नगरसेवक शिशिर परुळेकर ,भाजपा शहर अध्यक्षा प्राची कर्पे ,माजी उप नगराध्यक्ष किशोर राणे माजी नगरसेविका राजश्री धुमाळे भाजपा तालुका उपाध्यक्ष संजना सदडेकर युवक जिल्हा सचिव संदीप मेस्त्री,महेंद्र मुरकर, दादा कुडातरकर, प्रभाकर कोरगावकर, आप्पा सावंत,संदीप नलावडे,विठ्ठल देसाई, सुशील पारकर, राजन परब,आदींसह भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कणकवलीतील व्यापारी नागरिक उपस्थित होते.


यावेळी स्थाकिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू, मातीच्या वस्तू, दिवे, आकाश कंदील, खाद्य पदार्थ यांची माजी खासदार राणे यांनी पाहणी केली.डॉ. विद्याधर तायशेटे, युथ अध्यक्ष तेजस घाडीगावकर यांनी आपले विचार मांडले.नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्र संचलन विवेक ताम्हणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!