*कोकण Express*
*आज केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साधणार सिंधुदुर्गातील व्यावसायिकांशी संवाद!*
*संधीचा फायदा घेत जिल्ह्यात नवे उद्योगपर्व घडवण्यासाठी सज्ज व्हा – कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांचे व्यावसायिकांना आवाहन*
जिल्ह्यामधील व्यवसायिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी मा. नारायणरावजी राणे, सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री उद्योजक व व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. देशातील ऐशी टक्के उद्योग योजना समाविष्ट असणाऱ्या या खात्याचा आपल्या होम टाऊन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे आणि महत्वाकांक्षी उद्योगपर्व निर्माण व्हावे ही त्यांची इच्छा असून त्यादृष्टीने उद्योजक व व्यवसायिकांसोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक आणि उद्योजकांनी यावेळी उपस्थित राहून आपल्यासमोरील अडचणी आणि मागण्या थेट मंत्रीमहोदयांसमोर मांडून त्याचा पाठपुरावा करावा असे आवाहन कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांनी केले आहे.
कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे आज सायंकाळी ४:४५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. एमएसएमई रोड मॅप कोअर कमिटी जिल्ह्यात नव्या-जुन्या उद्योजकांना योजनांचा योग्य फायदा व्हावा यासाठी मागील काही दिवस सातत्यपूर्ण प्रयत्न करत असून आजही उद्योजकांसोबतची संवादचर्चा अधिक फायदेशीर व्हावी यादृष्टीने या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे.