भाजप किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्षपदी महेश सारंग

भाजप किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्षपदी महेश सारंग

*कोकण Express*

*भाजप किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्षपदी महेश सारंग*

*मालवण  ः प्रतिनिधी*भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी महेश सारंग यांची निवड करण्यात आली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी ही निवड जाहीर केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते महेश सारंग यांना कुडाळ येथील बैठकीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, उपाध्यक्ष किशोर नरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आपल्या सारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष पद देऊन भाजपाने आपला सन्मान केला आहे. या पदा सोबत मिळालेल्या जबाबदारीचे भान ठेवून आगामी काळात भाजप पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया महेश सारंग यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!