*कोकण Express*
*मोंदे गावच्या सरपंच ज्योत्स्ना जगन्नाथ मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*
*मोंदे गावचे शाखाप्रमुख वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली*
*वैभववाडी ः प्रतिनिधीी*
शिवसेना सचिव लोकसभा संसदीय गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळपे येथील शिवसेना मेळाव्यात मोंदे गावच्या सरपंच ज्योत्स्ना जगन्नाथ मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रवेशकर्त्यांमध्ये वैशाली वसंत मोरे, जगन्नाथ गंगाराम मोरे, अनाजी धोंडू नागप, रविंद्र आकाराम आमकर, बळीराम आत्माराम मोरे, सुरेश महादेव मोरे, दायानंद शिवराम नागप आदींचा समावेश आहे.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम पालव सावंत, शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, माजी सभापती रमेश तावडे, कणकवली नगरपंचायत शिवसेना गटनेते सुशांत नाईक, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, उपतालुका प्रमुख सुरेश पांचाळ, माजी उपसभापती अंबाजी हुंबे, जिल्हाकार्यकारणी सदस्य संभाजी रावराणे, कोळपे विभागप्रमुख जितेंद्र तळेकर आदी उपस्थित होते.*