कोकिसरे रेल्वे फाटक येथे भुयारी मार्गाला मंजुरी,माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते मोजणीचा शुभारंभ

कोकिसरे रेल्वे फाटक येथे भुयारी मार्गाला मंजुरी,माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते मोजणीचा शुभारंभ

*कोकण Express*

*कोकिसरे रेल्वे फाटक येथे भुयारी मार्गाला मंजुरी,माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते मोजणीचा शुभारंभ….*

*वैभववाडी / प्रतिनिधी*

तरेळे वैभववाडी राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे फाटक येथे भुयारी मार्गासाठी 65 कोटीचा निधी मंजूर झाला असून आज माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते मोजणीचा शुभारंभ करण्यात आला.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ६५ कोटीचा भरीव असा निधी देऊन या मार्गावरून फटका मुळे होणारी वाहतूकदारांची गौरसोय दूर होणार आहे .भुयारी मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार आहेत त्यांना चांगला मोबदला मिळेल .स्थानिक जमीन धारकांनी मोजणी साठी सहकार्य करावे जेणेकरून प्रत्येक्ष कामाला लवकरात लवकर सुरू करण्यात येईल आणि लवकर काम पूर्ण होऊन भुयारी मार्ग वाहतुकीस सुरू करण्यात येईल आणि रेल्वे फाटकामुळे वाहन धारकांची होणारी गौरसोय दूर होईल. असे जठार यांनी स्पष्ट केले.
या भुयारी मार्ग होण्यासाठी माजी आमदार प्रमोद जठार अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होते केंद्रीय वाहतुकी मंञी नितिन गडकरी यांनी जठार यांच्या प्रयत्नाला प्रतिसाद देऊन ६५ कोटीचा निधी मंजुर केला आहे.
यावेळी सभापती अक्षता डाफळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे तालुका अध्यक्ष नासीर काझी ,अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, आणि जमीन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!