*कोकण Express*
*फोंडाघाट येथे युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट येथे झालेल्या फोंडाघाट जिल्हा परिषदेच्या मेळाव्या मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन फोंडाघाट येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी खासदार विनायकजी राऊंत साहेब यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य आपल्या हाती घेऊन फोंडाघाट भगवामय करून टाकले*
*प्रवेशकर्ते युवकांमध्ये प्रामुख्याने चिन्मय सावंत,ओंकार पवार, निनाद पारकर,साहील बीडये,आदेश म्हसकर, जितेंद्र सावंत, रुपेश वाळवे, प्रवीण पडेलकर, हरेश पावसकर, अमोल नवले, ओंकार हाऊल, शुभम पवार, सौरभ चव्हाण,आकाश गोसावी, रुपेश वाळवे,ओंकार लाड, कीर्तीसिंग जोईल, ऋषिकेश वाळवे, महेश जोइल,राजा हसनेकर, रामा वाळवे यांच्या सह फोंडा गावातील असंख्य युवा कार्यकर्ते होते. हया युवाई च्या प्रवेशाबरोबरच काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले त्यात प्रामुख्याने रवी राणे, वासू वाळवे, ध्रुव लाड, पुंडलिक आरेकर, सत्यवान लाड, प्रकाश वाळवे वगैरे कार्यकर्ते होते. यावेळी बोलताना खासदार विनायकजी राऊत साहेबांनी प्रवेश कर्त्यांचा योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल. शिवसेना हा पक्ष नसून कुटुंब आहे. आज आपण सर्वजण आमच्या कुटुंबात सामील झाला आहात आता तुमची संपूर्ण जबाबदारी ही शिवसेना पक्षाची असेल.तसेच फोंडा विभागाला विकासासाठी झुकते माप दिले जाईल. फोंडा गावातील प्रलंबित प्रश्न जसे डावा तिर कालवा, बाजारपेठ रस्ता रुंदीकरण लवकरच सोडवू. यावेळी व्यासपीठावर खासदारां सोबत जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत साहेब, अतुलजी रावराणे, महिला जिल्हा अध्यक्ष नीलम सावंत पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्टये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, माजी सभापती संदेश पटेल, आबु पटेल, कन्हैया पारकर, विभागप्रमुख बाबू राणे, शाम भोवड, सुभाष सावंत, शाखाप्रमुख सुरेश टक्के, राजू पटेल,पिंटू पटेल, अवी सापळे, माधवी दळवी, भाई सावंत, कोलते मॅडम, बंटी वरुंनकर, पवन भोगले, सौरभ सुतार इत्यादी उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचलन राजेश रावराणे यांनी केले तर आभार राजन नानचे यांनी मांडलेे.