जिल्हा बँकेची सीएनजी गॅसकीट फिटिंगसाठी ” सिंधुसारथी ” योजना ; सतीश सावंत

जिल्हा बँकेची सीएनजी गॅसकीट फिटिंगसाठी ” सिंधुसारथी ” योजना ; सतीश सावंत

*कोकण Express*

*जिल्हा बँकेची सीएनजी गॅसकीट फिटिंगसाठी ” सिंधुसारथी ” योजना ; सतीश सावंत*

*रिक्षा आणि फोर व्हीलरला करणार कर्जपुरवठा*

*सिंधुदुर्गनगरी*

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी गॅस किट बसविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने “सिंधु सारथी” सीएनजी किट कर्जपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पेट्रोलच्या वाढत्या किमती विचारात घेता सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांसाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. नवीन उत्पादित होणारी वाहने ही पेट्रोल बरोबरच सीएनजी गॅस, इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी असण्याचे शासनाने निर्धारित केले आहे. नवीन निर्मिती होणाऱ्या बहुतांशी वाहनांमध्ये कंपनीमार्फत असे किट बसवूनच वाहन बाजारात आणले जाते. तर जुन्या वाहण्यासाठी आरटीओ अथोराइज कंपनीद्वारे असे कीट बसविण्यात येते. सदर कीटसाठी रिक्षा व्यावसायिकांकडे एकरकमी एवढी रक्कम उपलब्ध होण्यामध्ये अडचणी असतात. याचा विचार करून बँकेच्या संचालक मंडळाने “सिंधुसारथी” सीएनजी किट कर्ज पुरवठा योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सिंधू सारथी सीएनजी किट कर्जपुरवठा योजनेमध्ये तीन चाकी वाहनांसाठी असे किट बसविताना अथोराईस डीलरच्या कोटेशनच्या ९० टक्के किंवा ३० हजार यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज मर्यादा राहील. चार चाकी वाहनांसाठी असे कीट बसविताना अथोराईस डीलरच्या कोटेशनच्या ९० टक्के कीवा ५० हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज मर्यादा राहील. या योजनेत कर्जाचा व्याजदर १० टक्के असून कर्ज परतफेड कालावधी ३६ महीने (तीन वर्षे) एवढा राहिला. वाहनाच्या आर सी बुकवर बँकेचा बोजा प्रथम निर्माण करून देणे आवश्यक राहील. ज्या वाहनावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा बोजा आहे अशांना जामीनदार देण्याची आवश्यकता नाही. अन्य रिक्षा व्यावसायिकांसाठी बँकेत खाते असलेले दोन सक्षम जामीनदार देणे आवश्यक राहील. कर्जाच्या नियमित परतफेडीसाठी रिक्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा क्यू आर कोड बसऊन प्रतिदिन ५० रुपये मात्र रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा करणे आवश्यक राहील. सदर कर्जासाठी दहा वर्षाच्या आतील वाहन असणे आवश्यक राहील. जास्तीत जास्त वाहनधारकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी तात्काळ व जलद कर्ज मिळण्यासाठी कर्ज मंजुरीचे अधिकार शाखा व्यवस्थापक यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!