*कोकण Express*
*आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल माजी आमदार प्रमोद जठार यांचा संगमेश्वर वासीयांकडून सत्कार*
*महामार्ग चौपदरीकरणाची रुंदी कमी करून आणण्यात जठार यांना यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील संगमेश्वर गावांशी संबंधित असलेल्या महामार्गाची वाढीव रुंदी कमी करून मिळावी म्हणून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला यश आल्याने भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांचा संगमेश्वर व्यापारी संघ व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जठार यांना ऋणनिर्देश व्यक्त करणारे सन्मानपत्र ही देण्यात आले. नावडी संगमेश्वर येथील व्यापारी वर्गाने व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटीत आपणाकडे केलेली मागणी सन्मानपूर्वक पूर्ण केल्याबद्दल संगमेश्वर व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थ आपले शतशः ऋणी आहे व राहील. असे या सन्मानपत्रात म्हटले आहे. भविष्यातही आमच्या समस्यांचा व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या सोडविण्यासाठी अशाच प्रकारचे सहकार्य कराल असा विश्वास आहे . भविष्यातील आपल्या राजकीय वाटचालीसाठी सर्व संगमेश्वर वासियांकडून आपणांस लाख लाख हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद .अशा शब्दात संगमेश्वर व्यापारी संघ व ग्रामस्थांनी जठार यांचे ऋण व्यक्त केले आहेत.