*कोकण Express*
*२०२४ मध्ये निवडणुकीला उभे राहून दाखवा- आम. वैभव नाईक*
*खा. नारायण राणेंच्या २०२४ ला स्वतः निवडणूक लढवावी;आम.नाईक यांचे राणेंना आव्हान..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नारायण राणेंनी शिवसेना संपवण्याची जेव्हा जेव्हा भाषा केली. त्यानंतर शिवसेना आजवर पहिल्या पेक्षा दुप्पट्टिने वाढली आहे. काल राणेंनी शिवसेनेचे कोकणातून ११ आमदार निवडून येणार नसल्याचे आव्हान दिले ते स्विकारून शिवसेनेने २०१४ सालीच आव्हान मुळातून मोडून काढले, त्यानंतर २०१४ मधे त्यांचा ही निवडणुकीत पराभव झालाच. तर त्यांच्या मुलाचा देखील पराभव २ वेळा शिवनेनेने केला. तसेच राणेंना माहितच असेलच गेल्या निवडणुकीत त्यांचा मुलगा पक्ष बदलून भाजपा मधून उभा राहिला अन्यथा तोही पराभूत झाला असता. त्यामुळे जेव्हा जेव्हा राणें शिवसेना संपवण्याचे आव्हान करतात तेव्हा कोकणातील जनताच आव्हान संपुष्टात आणते.स्वतः २०२४ पुन्हा राणेंनी आमदारकी लढवावी, असे खुले आव्हान शिवसेना आ.वैभव नाईक यांनी दिला आहे.
शिवसेनाचा आता मुख्यमंत्री देखील आहे. आपण २०१९ ला निवडणुकीतून पळ काढलात आता तुम्हाला आमचे आव्हान आहे. २०२४ च्या निवडणुकीत उभे राहा त्यावेळी तुम्हाला कळेल शिवसेनेचे ११ आमदार येतात की २१ असे आम. वैभव नाही यांची खा. नारायण राणेंना आव्हान आज दिले.