मळेवाड कोंडूरे गाव मर्यादित नरकासूर स्पर्धेचे 3 नोव्हेंबर ला आयोजन

मळेवाड कोंडूरे गाव मर्यादित नरकासूर स्पर्धेचे 3 नोव्हेंबर ला आयोजन

 *कोकण  Express*

*मळेवाड कोंडूरे गाव मर्यादित नरकासूर स्पर्धेचे 3 नोव्हेंबर ला आयोजन*

*मळेवाड ःःप्रतिनिधी* 

मळेवाड ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ, मळेवाड कोंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 नोव्हेंबर 2021 रोजी मळेवाड कोंडूरे गाव मर्यादित नरकासुर स्पर्धा व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी इच्छुक स्पर्धकांनी सहभाग घेण्यासाठी आपली नावे ग्रामपंचायत कार्यालयात नोंदवावीत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.नरकासुर स्पर्धेसाठी प्रथम — 3333 व चषक,द्वितीय —2222 व चषक,तृतीय — 1555 व चषक बक्षिसे देण्यात येणार आहेत.तर

आकाश कंदील स्पर्धेसाठी प्रथम 1001 व चषक,द्वितीय —701 व चषक,तृतीय — 501 व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आकाश कंदील स्पर्धा ही संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत होईल.तर नरकासूर स्पर्धा रात्री 8 ते 10 या वेळेत होईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. या स्पर्धा मळेवाड जकातनाका चौकात आयोजीत केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!