*कोकण Express*
*नवोदय विद्यालयात परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रवेश तात्काळ रद्द करा, अन्यथा आंदोलन*
*प्रसंगी जिल्हा परिषदेच्या विरोधात सुध्दा भूमिका मांडू…*
*भाजपचे प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा*
*सावंतवााडी ः प्रतिनिधीी*
सांगेली येथील नवोदय विद्यालयात परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रवेश तात्काळ रद्द करण्यात यावेत, अन्यथा पालकांना घेऊन आपण तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजपचे प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांना पत्रकार परिषदेत उपस्थित केले. विद्यार्थ्याना ९७ टक्केच्यावर मार्क असताना प्रवेश नाकारण्यात कसा आला, त्यामुळे आता आपण गप्प बसणार नाही. प्रसंगी जिल्हा परिषदच्या विरोधात सुद्धा आंदोलनाची आपली भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी डॉ.सतीश सावंत,विनोद सावंत, केतन आजगावकर,यश मडवळ आदी उपस्थित होतेे.