*कोकण Express*
*रस्ताच्या कामाला सुरूवात करा, अन्यथा कार्यकारी अभियंता यांना हाडांचा सापळा प्रतिकृती देणार भेट*
*सरपंच हेमंत मराठे यांचा इशारा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी मळगाव निरवडे न्हावेली मळेवाड मार्गे आरोंदा हा रस्ता खड्डेमय बनला असून अपघाताला कारणीभूत ठरत आहे.वेळोवेळी भेट घेऊन तोंडी व लेखी मागणी करूनही अद्याप पर्यंत कडून डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आलेले नाही नसल्याने मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक कार्यकारी अभियंता याना निवेदन देऊन रस्ता दुरूस्ती ची मागणी केली आहे. गेल्यावर्षी पासूनच या रस्त्याची दुरावस्था झाली असून यामुळे वाहनधारक, रुग्ण व प्रवासी यांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. सदरच्या मार्गावरील पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे व डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे.तसेच रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडावी.
येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष खड्डे बुजवणे,झाडी तोडणे व डांबरीकरण याला सुरुवात न केल्यास वाहनधारक व प्रवाशांना होत असलेल्या शारीरिक त्रासाची आपणाला जाणीव व्हावी, यासाठी हाडाचा सापळा प्रतिकृती भेट देणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच कार्यालयाच्या बोर्डाला हाडांच्या एक्स-रे ची माळ व झाडीच्या मोळ्या कार्यालयं समोर टाकून निषेध व्यक्त करून त्याच दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी कार्यालयं समोर सकाळीं 10 वाजता उपोषण छेडणाऱ असल्याचा इशारा मराठे यांनी दिला आहे.