*कोकण Express*
*नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गमार्फत गोपुरी आश्रम येथे करण्यात आली साफसफाई*
*कणकवली ः प्रतिनिधी*
१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत भारत भर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग होत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कणकवली तालुक्यातील वागदे येथील कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रममध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य निरोगी निरंतर’, ‘प्लॅस्टिक हटाव, बिमारी भगाव’ असा संदेश देत नेहरू युवा केंद्र मार्फत श्रमदानातून साफसफाई करण्यात आली.
यावेळी गोपुरी आश्रमाचे अमोल भोगले, अमोल सावंत, सदाशिव राणे, बी. एस. सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनायक मेस्त्री, कणकवली तालुक्याचे समन्वयक अक्षय मोडक, सहदेव पाटकर, श्रद्धा पाटकर, क्रांती जाधव, रेश्मा पारकर, सिद्धेश कांबळे, सुरज कांबळे, लक्ष्मण परब, प्रकाश आरोलकर, पुंडलिक कदम आदी उपस्थित होते.