*कोकण Express*
*ओवळीये स्मशान शेडसाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा*
*ओवळीये सरपंच विनायक उर्फ अब्जू सावंत यांची मागणीी*
*निधी उपलब्ध करून देईन, केसरकरांचे आश्वासन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
ओवळीये येथे स्मशान शेडसाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओवळीये सरपंच विनायक उर्फ अब्जू सावंत यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या कामांसाठी आपण प्राधान्याने निधी उपलब्ध करून देईन असे आश्वासन श्री. केसरकर यांनी सरपंच श्री. सावंत यांना दिले.
यावेळी गावचे मंदिर जीर्णोद्धार समिती अध्यक्ष व माजी सैनिक चंद्रकांत सावंत उपस्थित होते. गावातील स्मशान शेडचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. याठिकाणी अंत्यविधी करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते होती. स्मशानभूमीची गरज लक्षात घेता सरपंच श्री. सावंत यांनी आमदार निधीतून या कामासाठी निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या कामांसाठी आपण प्राधान्याने निधी उपलब्ध करून देईन असे आश्वासन श्री. केसरकर यांनी सरपंच श्री. सावंत यांना दिले.