बॉलिवूड कोरिओग्राफर प्रतीक ऊत्तेकर ची फोंडाघाट येथील व्यापारी अजित नाडकर्णी यांनी घेतली भेट

बॉलिवूड कोरिओग्राफर प्रतीक ऊत्तेकर ची फोंडाघाट येथील व्यापारी अजित नाडकर्णी यांनी घेतली भेट

*कोकण Express*

*बॉलिवूड कोरिओग्राफर प्रतीक ऊत्तेकर ची फोंडाघाट येथील व्यापारी अजित नाडकर्णी यांनी घेतली भेट*

*कोकणातील मुलांना डान्सचे शिक्षण देण्यासाठी येणार ; प्रतीक ऊत्तेकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोकण ही कलाकारांची खाण आहे. या खाणीतून अनेक रत्ने उपजली, ज्यांनी आपल्या कलेने आपल्यासोबत कोकणचेही नाव रोशन केले. अशातलाच एक कलाकार म्हणजे चिपळूण येथील प्रतीक ऊत्तेकर. प्रतीक हा कोरिओग्राफर असून त्याने ‘डान्स इंडिया डान्स’ मध्ये कोरिओग्राफी केली आहे. तसेच माधुरी दिक्षीत, रेखा, सलमान खान, जुही चावला, मौनी राॅय, अक्षयकुमार यांसारख्या अनेक बॉलिवूड कलावंतांना त्याने डान्स शिकवला आहे. कोकणातील या कलाकाराने मिळविलेले हे यश खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. फोंडाघाट येथील व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी प्रतीक ऊत्तेकर आणि त्याचे वडील रमेश उत्तेकर यांची भेट घेतली आणि प्रतिकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी प्रतिकने हे यश संपादन केले आहे. शाम दावतचे डांस अकादमीत प्रतिकने डान्सचे शिक्षण घेतले आहे आणि या शिक्षणाच्या जोरावर आज तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या मेहनतीने टाॅपचा कोरिओग्राफर आहे. असे असताना तो आपली कोकणची संस्कृती, इथल्या लोकांना विसरलेला नाही. कोकणातील मुलांना डान्सचे शिक्षण देण्यासाठी मी जरुर येईन, असे प्रतीकने अजित नाडकर्णी यांच्याशी बोलताना म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!