*कोकण Express*
*जिल्ह्याच्या विकासासाठी निधी नाही,मग वैद्यकीय महाविद्यालयाला पैसे कुठून आणणार…*
नारायण राणे; मुख्यमंत्री पिंजऱ्यात,तर गणपती आणणारे घरात बसल्याची टीका…
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी निधीं देऊ न शकणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अडीचशे कोटी कुठून आणणार?,त्यामुळे आधी जमिनीचा व निधीचा प्रश्न सोडवावा व नंतरच सत्ताधार्यांनी बोलावे,अशी खिल्ली माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत उडवली.दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पिंजऱ्यात लपून बसले आहेत,तर विमानातून गणपती आणणारे घरात बसले आहेत,अशीही टीका श्री.राणे यांनी आमदार दिपक केसरकर यांचे नाव न घेता केली.यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी आता राज्य शासनाच्या विरोधात जिल्हा भाजपच्या माध्यमातून लवकरच आंदोलन करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते.