मिशन युवा संस्था अंतर्गत जिप अध्यक्ष यांनी महाविद्यालय स्तरावर दीले लसीकरणाचे आदेश

मिशन युवा संस्था अंतर्गत जिप अध्यक्ष यांनी महाविद्यालय स्तरावर दीले लसीकरणाचे आदेश

*कोकण Express*

*मिशन युवा संस्था अंतर्गत जिप अध्यक्ष यांनी महाविद्यालय स्तरावर दीले लसीकरणाचे आदेश*

*सिंधुदुर्ग*

मिशन युवा स्वास्थ covid-19 लसीकरण अंतर्गत दिनांक 25 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत 18 वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाविद्यालय स्तरावर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत 18 वर्षावरील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. लसीकरणात पात्र लाभार्थ्यांची यादी शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे सोपवण्यात बाबत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांनी सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाने लसीकरण सत्रा साठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील जिप अध्यक्ष यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. तरी सर्व 18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील जिप अध्यक्ष यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!