*कोकण Express*
*मनसेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याध्येक्ष धिरज परब यांच्या मागणीला यश*
*आरोंदा गावाला मिळाले सोलर स्ट्रीट लाईट*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
मनसेचे वेंगुर्ला अरोंद्याचे ग्रामपंचायत सदस्य श्री. नरेशजी देऊळकर यांना आज राजगड येथे मनसेचे अभ्यासू प्रवक्ते श्री.संजयजी शिरोडकर व मनसेचे सचिव सचिनजी मोरे यांच्या हस्ते मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने पाच सौर ऊर्जेवरील पदपथ दिवे धिररजी परब यांच्या जवळ सुपूर्द करण्यात आले.यावेळी मनसेच्या सुरक्षा रक्षक सेनेचे अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर, मनसे लॉटरी सेनेचे चिटणीस मनोज आंबेकर उपस्थित होते. कोळसा टंचाई मुळे आधीच महाराष्ट्र राज्यावर वीज टंचाईचे संकट आहे त्यात महावितरणने अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणच्या लाईट बंद केल्या आहेत व वीजदर वाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मनसे मार्फत दिवाळी भेट मिळालेल्या या सोलर स्ट्रीट लाईट मुळे आरोंदा वासियांनी राज साहेब ठाकरे,मनसेचे प्रवक्ते संजय शिरोडकर, मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम व जिल्हाध्येक्ष धीरज परब यांचे आभार मानले.