*कोकण Express*
*गडनदी पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह…*
गडनदी पात्रात कणकवली हद्दीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह अज्ञात पुरुषाचा असून नेमका कोणाचा याचा तपास सुरू आहे. हळवल गावातील शेतकरी गुरांना पाणी देण्यासाठी नदी पात्रात गेले असता मृतदेह नदी पात्रात तरंगत असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी हळवल सरपंच दीपक गुरव यांना कल्पना दिली. त्यानंतर लागलीच हळवल पोलीस पाटील उदय सावंत, माजी पोलिस पाटील प्रकाश गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश परब व हळवल ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसात खबर दिली. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, याबाबत संभ्रम असून ही आत्महत्या ही घातपात, याबाबत उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहे.