दारूम विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी

दारूम विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी

*कोकण  Express*

*दारूम विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये आज दुपारी समोरासमोर धडकल्‍याने अपघात झाला. यात कारमधील चौघे प्रवासी जखमी झाले. दारूम गावच्या हद्दीत ही घटना घडली.
विजयदुर्ग कासार्डे मार्गावर मारुती ओमनी व्हॅन (MH-01–AH– 9346) आणि अल्टो के टेन (MH-07-AB–4560) या दोन कार दारूम येथे समोरासमोर धडकल्‍या. अपघातात ओमनी व्हॅन मधील दोन प्रवासी जखमी झाले असून निर्मला दीपक समजीसकर, दीपक यशवंत समजीसकर, माधुरी दयानंद मेस्त्री, प्रथमेश दयानंद मेस्त्री अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान अपघातस्थळी एपीआय शेखर शिंदे, हवालदार वंजारे यांनी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!