*कोकण Express*
*वैभववाडी बुद्ध विहारमध्ये कायदेविषयक जनजागृती*
*वैभववाडी प्रतिनिधी*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वैभववाडी येथे शनिवार दि.२३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजता बुध्द विहार सभागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही वैभववाडीकर व रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल तसेच तालुका न्याय व विधी सेवा समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील सर्व सामान्य तरतुदी या विषयावर ॲड. अजितसिंह काळे तर अपघात, नुकसान भरपाई आणि मोटार वाहन कायदा या विषयावर ॲड. दिपक अंधारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी वैभववाडी तालुक्यातील नागरीकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आपल्या शंकांचे व प्रश्नांचे मार्गदर्शकांकडून निरसन करून घ्यावे असे आवाहन आम्ही वैभववाडीकर, रोटरी क्लब कणकवली, न्याय व विधी सेवा समिती कणकवली यांनी केले आहे.