*कोकण Express*
*वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रशालेत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन*
*श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल येथील आयोजन*
*मालवण ः प्रतिनिधी*
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेत ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांचा जीवन परिचय आणि कार्य यांची माहिती देणारी भाषणे केली. तर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि आवडीने वाचन करावे यासाठी वाचू आनंदे या तासिकेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. पी. एच. कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रशालेतील शिक्षिका सौ. पी. पी. सनये, सौ. व्ही. एन. दळवी, कु. पी. जी. केळुस्कर, यांसह विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.