*कोकण Express*
*ऍड. विराज भोसले ,संजय कामतेकर, उर्वी जाधव यांनी सभापती पदासाठी नामनिर्देशन केले दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी आज निवड होत आहे. या पदासाठीचे नामनिर्देशन अर्ज ऍड. विराज भोसले, संजय कामतेकर, उर्वी जाधव यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे दाखल केले आहेत. यात बांधकाम सभापती पदासाठी ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापतीपदी उर्वी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुपारी सव्वादोन वाजल्यानंतर विषय समिती सभापती निवडीची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी वैशाली राजमाने करणार आहेत.