*कोकण Express*
*मेट्रो सिटीच्या धर्तीवर एकाच छताखाली कणकवलीत मिळणार दिवाळी साहित्य…!*
*दिवाळी सणासाठी लागणाऱ्या पारंपरिक वस्तूचे प्रदर्शन, विक्री…!*
*कणकवली न.पं., युथवेलफेअर असोशियन सिंधुदुर्गचे आयोजन…!*
*नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिवाळी सणानिमित्त कणकवली नगरपंचायत व युथ वेल फेअर असोशिएशन यांच्यावतीने २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी बाझार कुंभार समाजाने बनवलेली मातीची भांडी व विविध हस्त कलेतून तयार केलेली साधने प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेला सर्व प्रकारचा फराळ विक्री साठी उपलब्ध असणार आहे, या सर्वांना लाईट व टेबल व्यवस्था नगरपंचायतच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, मेघा गागण, अण्णा कोदे, विराज भोसले, बांधकाम सभापती अभिजित मुसळे, अजय गागण, किशोर राणे, संस्थेचे विवेक ताम्हणकर, सचिव रुपेश घाडी, मनीष सागवेकर, सहसचिव रौफ काझी आदी उपस्थित होते.
कुंभार समाजाचे १५ स्टाँल लागणार आहेत.हा बाजार पेट्रोल पंप समोर उड्डाण पुलाच्या खाली असणार आहे. शहरातील नागरिकांना फराळ व आकाश कंदील उपलब्धता होईल. मातीच्या पणत्या देखील त्याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मातीचे कंदील देखील असणार आहेत. २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत हा दिवाळी बाजार असणार आहे. कणकवली शहरातील बचतगटांचे नियोजन मेघा गागण यांच्याकडे असेल. टेस्ट करुन फराळ ऑर्डर द्यावेत. कणकवली शहरातील नागरिकांना आगळंवेगळं आयोजन असेल. २८ ऑक्टोबरला रात्री ५.३० वाजता उद्घाटन असेल, असे समीर नलावडे यांनी सांगितले.
कुंभार समाजाला व्यासपीठ देण्यासाठी हा प्रयत्न आहे. कुंभार समाज लाईव्ह माती कामाचा प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. तसेच दर दोन महिण्याने याबाबत पुन्हा प्रदर्शन ठेवले जाणार आहे, असेही समीर नलावडे यांनी जाहीर केले.