दीपावली उत्सवानिमित्त नागपूर करमाळी रेल्वेसेवा सुरू

दीपावली उत्सवानिमित्त नागपूर करमाळी रेल्वेसेवा सुरू

*कोकण Express*

*दीपावली उत्सवानिमित्त नागपूर करमाळी रेल्वेसेवा सुरू*

*कोकणातून नांदुरा,शेगांव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या विशेष गाडी*

*रायगडः*

आगामी दिवाळी पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकण व गोव्यात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वे गाडीच्या  फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ३० ऑक्टोबर रोजी या रेल्वे गाड्या सुटणार असुन शेगांव थांबा असल्याने अकोला ते रत्नागिरी जाण्यासाठी गाडी उपलब्ध झाली आहे
०१२३९ नागपूर रेल्वे स्थानकावरून १५.५० वा सुटेल व दुसर्‍या दिवशी करमाळी येथे १४.१५ पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता  ०१२४० ही विशेष गाडी  ३१ ऑक्टोबर रोजी करमाळी स्थानकावरून २०.४० वा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.१० वा नागपूर येथे पोहोचेल
या रेल्वे सेवेला वर्धा,बडनेरा जं,अकोला जं,शेगांव,भुसावळ जं,नाशिक रोड,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग नगरी,कुडाळ रोड,सावंतवाडी रोड,थिवीम स्थानकावर  थांबणार आहे
या रेल्वे सेवेला कायमस्वरूपी सुरू करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष व दापोली शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र पेठकर यांनी डिव्हिजन रिजनल मॅनेजर यांच्याकडे करण्यात आली आहे
तरी लवकरात लवकर कायमस्वरूपी सुरू करावी अशी प्रवाशी वर्ग,कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतूले यांच्याकडून वारंवार पत्राद्वारे करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!