देवगड मध्ये ‘तन्वी’ज ब्युटीपार्लर’ आयोजित रंगभूषा आणि केशभूषा कार्यशाळा

देवगड मध्ये ‘तन्वी’ज ब्युटीपार्लर’ आयोजित रंगभूषा आणि केशभूषा कार्यशाळा

*कोकण Express*

*देवगड मध्ये ‘तन्वी’ज ब्युटीपार्लर’ आयोजित रंगभूषा आणि केशभूषा कार्यशाळा*

*आयोजित स्वामी सलोन आणि अकॅडमी च्या कार्यशाळेला संपूर्ण जिल्ह्यातुन प्रतिसाद*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड वैक्स म्यूझियम मधील सभागृहात तन्वी’ज ब्युटीपार्लर’ आयोजित रंगभूषा आणि केशभूषा कार्यशाळा पार पडली. तन्वी योगेश चांदोसकर यांच्या संकल्पनेतून आणि अंजनी ब्यूटी पॉइंट यांच्या सहयोगाने स्वामी सलोन आणि अकॅडमी च्या कार्यशाळेला संपूर्ण जिल्ह्यातुन भरभरुन प्रतिसाद मिळाला.
सेलेब्रिटी हेयर स्टायलिस्ट आणि कुणकेश्वरचा सुपुत्र सागर चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली केशभूषा या विषयावर मार्गदर्शन करून, उपस्थित इच्छुक मंडळींची केशभूषा करून वेगवेगळे प्रयोग करून दाखवले. त्याचप्रमाणे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ओमकार गुप्ता यांनी देखील रंगभूषा या विषयावर मार्गदर्शन करून उपस्थितांवर प्रयोग करून दाखवले.

देवगड मध्ये आयोजित या कार्यशाळेला कुडाळ, कणकवली, सावंतवाडी मालवण या तालुक्यांमधून पण तरुण वर्ग उपस्थित होता. त्याचप्रमाणे देवगडमधील सलून आणि ब्युटी पार्लर अशा लघु उद्योगिय क्षेत्रातील व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालत असलेल्या लेडिज ब्युटी पार्लर आणि सलून या लघु उद्योगांना योग्य व आधुनिक पद्धतीचे मार्गदर्शन मिळावे व त्यामधून अधिक सुसूत्रता आणि आधुनिकता आणून या लघु उद्योगाचा विकास व्हावा हे प्रमुख उद्धिष्ट ठेऊन ‘तन्वी’ज ब्युटी पार्लर’ च्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते..
प्रमाणपत्र प्राप्त व अनुभव पूर्ण मार्गदर्शन असलेली ही कार्यशाळा असल्यामुळे सर्व सहभागी वर्गातून समाधान व्यक्त होत असून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या याबाबत कृतज्ञाता व्यक्त होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!