भक्तीमय वातावरणात ‘नवदुर्गा युवा मंडळा’च्या देवी दुर्गा मातेचा विसर्जन सोहळा संपन्न-

भक्तीमय वातावरणात ‘नवदुर्गा युवा मंडळा’च्या देवी दुर्गा मातेचा विसर्जन सोहळा संपन्न-

*कोकण Express”

*भक्तीमय वातावरणात ‘नवदुर्गा युवा मंडळा’च्या देवी दुर्गा मातेचा विसर्जन सोहळा संपन्न*

*देवी विर्सजनवेळी कार्यकत्यांचे नयन पाणावले*

फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर नवदुर्गा युवा मंडळ आयोजीत सार्वजनिक नवरात्रोत्सवानिम्मित देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन शारदीय नवरात्रारंभ ते विजयादशमी दसरा या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक,सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा करुन शनिवार दि. १६/१०/२०२१ रोजी भक्तीमय वातावरणात शेकडो भाविक भक्ताच्या उपस्थितीत मिरवणुकीचा रथ,ढोल ताशाचा गजर आणि फटाक्याची रोषणाई आतषबाजी करीत नवीन कुर्ली ते फोंडा बाजारपेठ- मारुती मंदिर अशी मिरवणुक काढुन देवी दुर्गा मातेचं भक्ताच्या नयनआश्रुनी विसर्जन करण्यात आले.
नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) या मंडळाकडुन गेली १९ वर्षे सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो,या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये मुलां- मुलींकरीता वेशभुषा स्पर्धा,पंचक्रोषी रेकॉर्ड डान्स,संगीत खुर्ची,महिलांकरीता विविध फनी गेम्स,फुगडी नृत्य तर अबालवृध्दांकरीता भजन,प्रवचन यासारखे कार्यक्रम डबलबारी सारखे मनोरजंन कार्यक्रम तर रक्तदान शिबीर,श्रमदान शिबीर यासारखे सामाजिक उपक्रम राबवले होते.
भक्तीमय व आनंदाच्या वातावरणात मिरवणुकीच्या सोहळ्यास युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी उपाध्यक्ष दिपक शिंदे सचिव अविनाश चव्हाण खजिनदार प्रदिप आग्रे मार्गदर्शक अरुण पिळणकर,मंगेश मडवी तसेच अमित दळवी, सचिन साळसकर यासारखे अंसख्य कार्यकत्ये तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते सचिव धिरज हुंबे खजिनदार रविंद्र नवाळे तसेच कृष्णा परब,भगवान तेली यासारखे शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. विसर्जन सोहळ्यास महिला आणि मुलीची उपस्थिती लक्षणिय होती. नवीन कुर्ली ते फोंडा बाजारपेठ- मारुती वाडी असा निघालेल्या मिरवणुक सोहळ्यात मिरवणुकीतील रथ आणि त्या रथामधील देवी दुर्गा माता खास आकर्षक वाटुन उपस्थितांचे लक्ष वेधुन घेत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!