*कोकण Express*
*राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांचा वाढदिवस कणकवली नगरपंचायतच्या वतीने उत्साहात साजरा*
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे नेते व कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी नगरसेवक अबिद नाईक यांचा वाढदिवस कणकवली नगरपंचायतच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केक कापून अबिद नाईक यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, सामाजिक कार्यकर्ते सुशील पारकर आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायत च्या वतीने केलेला माझा सत्कार व दिलेल्या शुभेच्छा या मला घरच्या शुभेच्छां सारख्या आहेत असे उद्गार अबिद नाईक यांनी याप्रसंगी काढले.