*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात खारेपाटण ते ओसरगाव पर्यंत ठिकठिकाणी मृत्युचे सापळे*
*मुंबई गोवा हायवेवर वारंवार होणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा हायवेवर हळवल फाट्यावर इनोव्हा व कंटेनरचा अपघात झाला सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही परंतु प्रचंड नुकसान झाले.या अगोदरही याचठिकाणी अपघात झाले आहेत. कणकवली तालुक्यात खारेपाटण ते ओसरगाव पर्यंत ठिकठिकाणी मृत्युचे सापळे या ढिम्म प्रशासनाने लावले आहेत असा आरोप काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीर घेतल्या परंतु त्यांचे पैसे अदा केलेले नाहीत. त्यामुळे कासार्डे ,नांदगाव, वागदे सारख्या कित्येक ठिकाणी रस्ते अडवलेले आहेत.लोक ऊपोषण, आंदोलन करत आहेत परंतु त्याची दखल घेतली जात नाही. प्रशासनाकडे कित्येक निवाडे 4 वर्ष पडुन आहेत परंतु त्यावर निर्णय घ्यायला प्रशासनाला वेळ नाही.हे असे किती दिवस चालणार? लोकांचे बळी गेल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का?गेल्यावर्षी मी ऊपोषण केल्यावर प्रशासनाला जाग आली आणि मग जमिनीसाठी जे तुकडे शिल्लक राहीलेले होते त्यांचे नोटीफिकेशन झाले .त्यावर वर्ष झाले तरी काय कारवाई झाली हे समजत नाही.लवकरच आम्ही काँग्रेसतर्फे या विषयावर आंदोलन करणार आहोत.प्रशासनाने हि वेळ आमच्यावर आणु नये.असे काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी म्हटले आहे.