*कोकण Express*
*वाढदिवसाचे औचित्य साधून “दिविजा वृद्धाश्रमास” अत्यावश्यक वस्तू प्रदान करत दादा कुडतरकर यांनी वाढदिवस केला साजरा*
*रोटरी क्लब मार्फत पाककला स्पर्धा आणि विधी अन्याय समितीवर चर्चा सत्र*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, रोटरी क्लबचे माजी असिस्टंट गव्हर्नर, नामवंत संस्थांचे विश्वस्त, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर यांनी त्यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत दि. १२ ऑक्टोबर रोजी असलदे नांदगाव येथील दिविजा वृद्धाश्रमास १ मेगा फॅन आणि २०० डायपर प्रदान केला. आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत आपला वाढदिवस साजरा करत दादांनी सामाजिक भान जपले. यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे प्रेसिडेंट रो. विद्याधर तायशेट्ये, दीपक अंधारी, महेंद्र मुरकर, संतोष कांबळी, रवींद्र मुसळे, रंजना कुडतरकर उपस्थित होते.
दादा दरवर्षी आपला वाढदिवस निरनिराळ्या निरनिराळ्या वृद्धाश्रमात साजरा करतात. यापूर्वी दादा कुडतरकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब, कणकवली ने पाककला स्पर्धा आणि विधी अन्याय समिती चर्चा सत्र आयोजित केले होते. याला उस्फुर्त प्रतिसाद, मिळाला. ऍड. उमेश सावंत, निकिता म्हापनकर, डॉ. प्रतिमा नाटेकर यांचे यासाठी कायदेशीर मार्गदर्शन लाभले. पाककला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच रोटरी क्लब कणकवली परिवारातर्फे सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर यांचा सत्कार करण्यात आला.

