मुंबईत मणप्पूरम फायनान्सला दणका

मुंबईत मणप्पूरम फायनान्सला दणका

*कोकण Express*
  1. *मुंबईत मणप्पूरम फायनान्सला दणका….*
*वाहन कर्जधारकांकडून हप्त्याची वसुली करताना बेकायदेशीर प्रक्रियेचा अवलंब..*
मुंबई ः
मुंबईत मणप्पूरम फायनान्सला दणका दिल्यानंतर काल दुपारी आम्ही नवी मुंबईत इंडसइंड बँकेत आलो. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात बँकेच्या व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा केली. वाहन कर्जधारकांकडून हप्त्याची वसुली करताना बेकायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला जात असल्याबद्दल मनसेच्या शिष्टमंडळाने कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. मनसेच्या शिष्टमंडळात सर्वश्री संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे, गजानन काळे, आरिफ शेख, नितीन खानविलकर, अक्षय काशिद आणि वाहतूक व्यावसायिक मुराद नाईक यांचा समावेश होता.
बैठकीनंतर इंडसइंड बँक व्यवस्थापनाने आपलं आश्वासन-पत्र मनसेला दिलं. या पत्रात “कर्ज घेतलेल्या ग्राहकांना यापुढे फोन करताना, त्यांच्याकडून कर्ज वसुली करताना आणि वाहन जप्तीची कारवाई (repossession action) करताना रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे तसंच संबंधित कायदे यांचं पूर्ण पालन केलं जाईल, कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. तसंच, ग्राहकांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी येत्या काही दिवसात पर्याय सुचवला जाईल” असं आश्वासन इंडसइंड बँक व्यवस्थापनाने मनसेला दिलं आहे.
वाहतूक व्यावसायिकांना- ग्राहकांना ठोस आर्थिक दिलासा मिळावा यासाठी मणप्पूरम फायनान्सप्रमाणे इंडसइंड बँकेलाही (खरंतर, सर्वच ‘एनबीएफसी’ना) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला विस्तृत प्रस्ताव- योजना देणार आहे. या प्रस्ताव- योजनेवर पुढच्या २ आठवड्यात ‘एनबीएफसी’ आणि मनसे यांमध्ये पुन्हा चर्चा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!