*कोकण Express*
*अध्यापन सोडून शिक्षकांना कोविडची कामे*
*मुलांचा शिक्षणाचा आनंद हिरावून घेतला जातो ; शासनाचा अजब कारभार*
*सिंधुदुर्ग*
गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा शासन निर्णयानुसार चार आॅक्टोबर पासून सुरू झाल्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेले दीड वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.शिक्षकांनी शासनाच्या आदेशानुसार कोविड ड्युटया सांभाळून जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.आता शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य सुरू झाले असताना मागील पत्रांचा संदर्भ देऊन शिक्षकांना कोविड ड्युट्या काढून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आणली जात आहे.शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या ड्युट्या रद्द करण्यात याव्यात असे आदेश असतानाही ड्युट्या लावल्या जात आहे हे योग्य नाही.शिक्षणविभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे असे दिसून येते.एकीकडे शाळा सुरू झाल्याबरोबर लगेच तपासणी करून शिक्षकांनी प्रत्यक्ष अध्यापन सुरू केले आहे का?सर्व शिक्षक उपस्थित आहेत का?याची तपासणी करायची आणि दुसरीकडे शिक्षकांना इतर कामे लावायची.शिक्षक भरती नसल्याने काही शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत.शिक्षक जर आता रस्त्यावर उभे राहून हातात थर्मलगण घेऊन टेंम्परेचर तपासणी करत राहिले तर शाळेतील वर्ग शिक्षकांना वाऱ्यावर राहणार याबाबतची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासनाच्या या अजब कारभाराबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली असुन तात्काळ या ड्युट्या रद्द करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष श्री वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनीकेली आहे.