*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय सेवेतील डॉक्टरांचे पगार थकीत…!*
*या गंभीर प्रश्नी सत्ताधारी लक्ष देणार का? – राजन तेली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील कोविड योध्ये डॉक्टर प्रामाणिक काम करत असताना सरकार ने त्यांना वाऱ्यावर सोडले. मेडिकल कॉलेजच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी यामुळे आत्मपरीक्षण गरज आहे. 27 पैकी 16 डॉक्टरांनी परतीचा मार्ग पत्करला. यातील 46 पैकी 43 डॉक्टर हे बीएएमएस व 3 एमबीबीएस आहेत त्यांना आजही पगार नाही. सावंतवाडी रुग्णालयातील 3 भुलरोगतज्ञ चे 1 कोटी पेक्षा जास्त पेमेंट थकीत आहेत. या गंभीर प्रश्नी सत्ताधारी लक्ष देणार का? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे पगार होत नाहीत अशा स्थितीत जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणण्याच्या घोषणा करणारे सत्ताधारी नेते याप्रश्नी सामाजिक बांधिलकी ठेऊन लक्ष देणार का? असा सवाल तेली यांनी केला. कोविड काळात काम केलेले आरोग्य सेविका, वॉर्डबॉय अगोदरच वाऱ्यावर टाकले गेले. भरती प्रक्रिया करा अशी मागणी करूनही 536 पेक्षा जास्त पद रिक्त आहेत. सरकारला तारीखच मिळत नाही. आरोग्य विभागात भरती करण्याची विनंती केली तरी दुर्लक्ष होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 14 वर्ष काम केले ते अनुभवी कर्मचाऱ्याना कोविड काम द्या अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा स्तरावर भरतीसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार द्या. त्यांच्यावरही सरकारचा विश्वास नाही का? जिल्ह्यातील एन आर एच एम अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने पगाराचे पैसे दिले. एजन्सी नेमून तिचे पोट भरण्यासाठी परीक्षा राज्यस्तरावरून घेण्याचा प्रयत्न होतोय का? जिल्ह्यातील स्थानिक कर्मचाऱ्यांनी मधून जी पदे भरणार नाहीत ते कर्मचारी बाहेरून घ्या. अजून किती वर्षं गोव्यावर राहणार? आज डॉक्टर काम सोडून जात असताना जर साथरोग वाढले तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कशी काम करणार? लोकांचे जीव गेले तर त्याला जबाबदार कोण? लखिंमपुर मधील घटनेनंतर महाराष्ट्र बंद पुकारता मग साथ रोगाने जनतेचे बळी गेले तर सरकार काय करणार? या सर्व प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सचिव, सर्वांना निवेदने दिली तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप श्री तेली यांनी केला.

