*कोकण Express*
*गोकुळ दूध संघाची भेट ही केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठीच*
*जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अडचणीत आणले*
*माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती*
कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक लागल्यानंतर डेअरी व्यावसायिकांची आठवण झाली.प्रतिभा डेअरीने शेतकऱ्यांची २ कोटी ६५ लाख व सबसिडीही गिळंकृत केली आहे. त्याचा जिल्हा बँक चेअरमन व दुध संघाचे अध्यक्षांना आताच पुळका का आला?शेतकऱ्यांचे थकीत अडीज कोटी बँकेने कर्ज स्वरुपात जिल्हा दूध संघाला देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.गोकुळ दूध संघाची भेट ही केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठीच असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.
मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गोकुळ दूध आणून शासकीय डेअरीला बंद पडण्याचे काम केले.त्यावेळीचे जिल्हा बँक चेअरमन व संचालक जबाबदार आहेत.शेतकऱ्यांचे दूध थेट गोकुळला दूध द्यायला लावले.तेव्हा दूध संघ बंद झाला.प्रतिभा दूध डेअरी २ कोटी ६५ लाख थकीत आहेत .त्याला बँक चेअरमन व त्या गटातून निवडुनआलेला संचालक जबाबदार आहेत.शेतकऱ्यांना पैसे संघाने दिले पाहिजेत,त्यासाठी जिल्हा बँकेने उर्जितावस्था आणण्यासाठी ३५ लाख दूध संघाला दिले. त्याप्रमाणे २ कोटी ६५ लाख द्यावेत.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.
गेल्या निवणुकीत भाजपा आमदारांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याची जबाबदारी घेतली आहेत.ते अद्याप पैसे देऊ शकले नाहीत.२४ ला बैठक घेऊन संघामार्फत दूध देण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह धरला जात आहे.कारण आता डोळ्यासमोर जिल्हा बँक निवडणूक आहे. जवजवळ २५ दूध संस्था अनुउपस्थित राहिल्या.गोकुळ दूध संघाला इतर जिल्ह्यातील संकलन करता येत नाही.त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केला.शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी अडचणीत आणण्याचे काम केलं.डेअरी व मत्स्य मधून निवडुन गेलेल्या सदस्यांनी प्रयत्न केला नाही.त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत दोन ते तीन उमेदवार उभे करणार आहोत,असेही परशुराम उपरकर यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचा २०१८ मधील रिपोर्ट आम्हाला मिळाला आहे,त्या त्रुटी जनतेसमोर मांडणार आहोत.एकीकडे संगणकीय प्रणाली केल्यानंतर कर्मचारी कमी होतात. मग कर्मचारी नव्याने भरती केली गेली. १०० पेक्षा अधिक लोकांना रोजदारी वर ठेवण्यात आले असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.