*कोकण Express*
*मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे काकासाहेब खंबाळकर यांच्या “मनामनातील वटवृक्ष” पुस्तकाचे प्रकाशन*
*मुंबई*
आज १३ ऑक्टोबर रोजी मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे काकासाहेब खंबाळकर यांच्या “मनामनातील वटवृक्ष” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन देशाचे लाडके नेते राजकारणातील चाणक्य मा. शरद चंद्र पवार त्यांच्या उपस्थित व हस्ते पार पडण्यात आला. त्या निमित्ताने जलसंपदामंत्री जयवंत पाटील, मंत्री संजय बनसोडे, गायक आनंद शिंदे यांनी या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. तसेच यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रतन भाऊ कदम, उत्तम गायकवाड, युवा नेते अमोल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रतन भाऊ कदम यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन कामा संबंधित चर्चा झाली.