ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच पदासाठी भाजपच्या मिलन विनायक पार्सेकर विजयी

ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच पदासाठी भाजपच्या मिलन विनायक पार्सेकर विजयी

*कोकण  Express*

*ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच पदासाठी भाजपच्या मिलन विनायक पार्सेकर विजयी*

*मळेवाड  ः प्रतिनिधी*

ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच पदासाठी भाजप पुरस्कृत जनता गाव विकास पॅनेलच्या मिलन विनायक पार्सेकर विजयी ठरल्या असून त्यांनी सेना पुरस्कृत सानिका शेवडे यांचा 8 विरुध्द 1 असा पराभव केला.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे वर भाजप पुरस्कृत जनता गाव विकास पॅनेल चे वर्चस्व होते. अकरा सदस्यांपैकी नऊ सदस्य हे जनता गाव विकास पॅनलचे होते. नव्याने निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतचे सरपंच पद नागरीकांचा मागास प्रवर्ग आरक्षित होते.मात्र जनता गाव विकास पॅनल मध्ये चार उमेदवार हे या प्रवर्गातील असूनही सदरचे पद रिक्त ठेवून उपसरपंच हेमंत मराठे यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार सोपवण्यात आला होता.मात्र याला आठ महिने उलटून गेल्याने पुन्हा सरपंच पदासाठी निवडणूक जाहीर झाली.मंगळवारी झालेल्या निवडणुकीत विरोधी शिवसेना गटाने भाजप पुरस्कृत जनता गाव विकास पॅनल मधील सदस्य सानिका शैलेशकुमार शेवडे यांना आपल्या गळाला लावून फोडले. आणि त्यांना भाजप पुरस्कृत जनता गाव विकास पॅनलच्या मिलन विनायक पार्सेकर यांच्यासमोर सरपंच पदाच्या रिंगणात उतरविले.मात्र प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी सानिका शेवडे यांना ज्या सदस्यांनी सूचक आणि पाठिंबा दिला होता ते अर्जुन उर्फ तात्या जयद्रथ मुळीक व कविता कृष्णा शेगडे ह्या मतदानावेळी गैरहजर राहिल्या.तर जनता गाव विकास पॅनेलचे आठ सदस्य हे प्रत्यक्ष मतदानावेळी उपस्थित असल्याने मिलन पार्सेकर यांना आठ मध्ये व सानिका शेवडे यांना त्यांचे स्वतःचे एक मत पडल्याने शेवडे यांचा सात मतांनी पार्सेकर यांनी पराभव करत सरपंचपद मिळवले. सेनेच्या ज्या सदस्यांच्या भरवश्यावर शेवडे यांनी सरपंच पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल केला ते दोन्हीं सदस्य मतदाना वेळी उपस्थित न राहिल्याने शेवडे एकाकी पडल्या.प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित विरोधी गटाचे दोन्ही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहिले.मात्र निवडणूक अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी त्यांना गैरहजर घोषित केले. यामुळे सरपंच पदाच्या रिंगणात उतरलेल्या शेवडे यांचा सेनेच्या सदस्यांनी आयत्यावेळी घात केल्याची चर्चा मळेवाड चौकात रंगली होती.
यापूर्वी सरपंच पद रिक्त असल्याने प्रभारी सरपंच म्हणुन उपसरपंच हेमंत मराठे यांनी काम पाहिले होते.या निवडणूक प्रक्रिये वेळी हेमंत मराठे, महेश शिरसाठ, मधुकर जाधव,स्नेहल नाईक, मधुकर जाधव,अमोल नाईक, गिरिजा मुळीक, खुशी कुंभार हे जनता गाव विकास चे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.तसेच जनता गाव विकास पॅनेलचे मार्गदर्शक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत सखाराम चव्हाण यांनी काम पाहिले. ग्राम विस्तार अधिकारी अनंत गावकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!