*कोकण Express*
*पळसंब शाळा नं. १ मध्ये शारदोत्सव साजरा*
*रांगोळी स्पर्धेत मयुरी मुणगेकर प्रथम*
*मालवण ः प्रतिनिधी*
पळसंब शाळा नं. १ मध्ये शारदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी शारदा मातेची पूजा कापडी परिवाराकडून करण्यात आली. तसेच शाळेतील मुलांनी पाटी पुजन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेटी बचाव बेटी पढाव, कोरोना विषयक रांगोळी या विषयांवर रांगोळी काढण्यात आली. त्यामध्ये मयुरी मुणगेकर, अनुष्का सावंत, उत्कर्षा सावंत यांचे प्रथम तीन क्रमांक आले. या कार्यक्रमासाठी मुंबईवरून उपस्थित असलेले माजी विद्यार्थी गिरीधर पुजारे, विजय सावंत, दिवाकर परब यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील लहानपणातील आठवणींना उजाळा दिला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील सर्व लहान थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आज दिवसभर महिलांच्या फुगड्या, मिना-राजू मंच, लहान मुलांची, ग्रामस्थांची भजने होणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य अशोक बागवे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, मुख्याध्यापिका मानसी असरोडकर, शिक्षिका योगिता पवार, शाळा व्य. अध्यक्ष रवीकांत सावंत, उपाध्यक्ष रमेश मुणगेकर, उपसरपंच सुहास सावंत, शिक्षणप्रेमी अमरेश पुजारे, सदस्य उज्वला परब, अरूण माने, सिमा चव्हाण, अनिल पजारे, अनिल परब, रमेश परब, पिंट्या सावंत, उल्हास सावंत, प्रभू लाड इत्यादी गावातील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.