*कोकण Express*
*रक्तदान शिबीरासारखे सामाजिक कार्यक्रम आयोजीत करुन मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी*
*नवदुर्गा युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद*
कोरोनाच्या महामारीत आज संपुर्ण जग संकटात असताना व ठिकठिकाणी रक्ताचा तुटवडा भासत असताना काही सामाजिक स्वयंसेवी संस्था,मंडळे आपआपल्या परिने सामाजिक उपक्रम राबवुन मदत कार्यात आपला खारीचा वाटा उचलुन दातृत्वाचा धर्म निभावत आहेत,त्यातीलचं नवदुर्गा युवा मंडळ हे एक मंडळ आहे. संपुर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटातही सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा कार्यक्रम करीत असताना व सांस्कृतिक कार्यक्रमावर काही निर्बध,अटी असताना रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजुन नवदुर्गा युवा मंडळाने आयोजीत केलेला रक्तदान शिबीर कार्यक्रम निश्चितचं कौतुकास्पद आहे असे गौरवोद्वार उद्योजक तथा जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांनी रक्तदान शिबीर कार्यक्रम उद्घाटनवेळी काढले. कोरोना कोविड महामारीत रक्ताचा तुटवडा भासत असताना उत्कृष्ट व समयसुचक नियोजन यामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा होणार आहे. मंडळाची रक्तदान चळवळ ही कौतुकास्पद व समाजशील असून ही चळवळ भविष्यात युवा पिढीच्या माध्यमातून अधिक व्यापक व्हावी याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणुन माझे नेहमीच सहकार्य असेल असेही ते पुढे म्हणाले.
‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असुन आपल्या रक्ताच्या एका थेंबाने कुणा व्यक्तीचे प्राण वाचत असतात म्हणजेचं आपण केलेल्या रक्तदानाने आपण कुणाला तरी जीवदान देत असतो, म्हणुनचं रक्तदान हेचं सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबवणं नेहमीच अवघड आहे त्याकरीता कुशल संघटन आणि जनसंपर्क असणं आवश्यक आहे, सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमानिम्मित आयोजीत केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मंडळाचे नेहमीचं कौतुक करतो, अशा समाजोपयोगी उपक्रम आपण सतत राबवत रहावे. नवदुर्गा युवा मंडळ म्हणजे १८ वर्षापुर्वी लावलेले एक छोटसं रोपट होय या रोपट्याचं आज वृक्षामध्ये रुपांतर होत आहे परंतु भविष्यामध्ये या वृक्षाचं वटवृक्षामध्ये रुपांतर झालेले पहायला निश्चितचं आवडेल व त्याकरीता लागणारे सर्वतोपरी सहकार्य हे नेहमीच असेल असे प्रतिप्रादन माजी जिल्हा परिषद तथा माजी पशुसंवर्धन सभापती संदेश सावंत पटेल यांनी व्यक्त केले.
या रक्तदान शिबीर उद्घाटनप्रसंगी उद्योजक तथा जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत पटेल यासोबत फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे जिल्हा रक्तपेढी विभाग सिंधुदुर्ग डॉ. श्रीनिवास बेळणेकर, श्रीम.भारती भोसले- रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी,किशोर नांदगावकर- वैद्यकिय समाजसेवक,नितीन गावकर,उल्हास राणे,नंदकुमार आडकर- जिल्हा रक्तपेढी विभाग कर्मचारी युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी उपाध्यक्ष दिपक शिंदे,अमित दळवी,प्रदीप आग्रे,विजय आग्रे,सचिन साळसकर,अनिल दळवी,मंगेश मडवी,सुहास साळसकर,अतुल डऊर, भागेश पवार,मकरंद खेडकर,संदेश सुतार, तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते,भगवान तेली,अंकुश पिळणकर, अंकुश दळवी,चंद्रकांत तेली,सत्यवान सुतार,चंद्रकांत मर्गज,शिवराम पवार,सुभाष राणे,जनार्दन पवार,कृष्णा परब मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य गावातील ग्रामस्थ यांनी रक्त संकलन करुन शिबीर यशस्वी करण्यास सहकार्य केले,तसेच पंचम गृप फोंडाघाटचे अध्यक्ष राजेश शिरोडकर यांचेही विशेष सहकार्य लाभले.