हळवल ग्रामपंचायतचे आदर्शवत कार्य हळवल गावात मंदिरे व पायवाटांची साफसफाई

हळवल ग्रामपंचायतचे आदर्शवत कार्य हळवल गावात मंदिरे व पायवाटांची साफसफाई

*कोकण  Express*

*हळवल ग्रामपंचायतचे आदर्शवत कार्य हळवल गावात मंदिरे व पायवाटांची साफसफाई*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हळवल ग्रामपंचायतच्या माध्यमातून हळवल गावातील मंदिरे व महत्वाच्या पायवाटांची साफसफाई करण्यात येत आहे. हळवल गावात वार्षिक दसरोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी गावातील मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने देवतांसोबत गावभेटी साठी निघतात. या प्रवासात मिळणाऱ्या वाटा रानटी वनस्पतीमुळे बंद अवस्थेत असतात अशा परिस्थितीत त्याच वाटेने गावकरी प्रवास करत असतात. ही बाब लक्षात येताच हळवल सरपंच दीपक गुरव, उपसरपंच अरुण राऊळ यांच्या संकल्पनेतून हळवल गावातील मंदिरे व पायवाटा साफ करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. गावातील मंदिरे व पायवाटा यांची साफसफाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांनी एकमुखाने घेत ही मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या काळात निधीची कमतरता असल्यामुळे काटकसर करत ही मोहीम ग्रामपंचायत ने हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय स्तुत्य असून हे काम आदर्शवत असल्याचे हळवल गावातील ग्रामस्थांचे म्हणणे असून हळवल सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच कर्मचारी यांचे हळवल वासीयांनी आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!