*कोकण Express*
*स्वछता सर्व्हेक्षणात जिल्हा एक नंबर येण्यासाठी अभिप्राय नोंदवा*
*ओरोस ः प्रतिनिधी*
जिल्हा स्वच्छता विषयक स्पर्धेत सातत्याने राज्यात आपली छाप कायम ठेवत आहे. त्यामुळे स्वच्छता विषयक सर्वेक्षणात देखील जिल्ह्यातील नागरिकानी ssg 2021 हे एप्लीकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील स्वच्छता विषयक बाबी च्या प्रतिक्रिया नोंद करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत स्वच्छता विषयक सर्वेक्षणात अहमद नगर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून सिंधुदुर्ग जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे.
दिनांक 20 ऑक्टोंबर 2021 पर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात स्वच्छताविषयक सर्वेक्षणात प्रथम क्रमांक वर आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले मत नोंदवावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.